भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या नव्या निर्देशानुसार, केवायसी पूर्ण करण्यासाठी एसबीआयच्या शाखेत जाऊन पूर्ण करायचे आहे. ही क्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात अकाऊंटमध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्स्झॅक्शन होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. एसबी आतचा हा मेसेज ज्यांचा केवायसी पूर्ण झालेला नाही त्यांच्यामध्येच करण्यात आला आहे. आरबीआयने सार्यांसाठी केवायसी बंधनकारक केले आहे. केवायसीमुळे बॅंक आणि ग्राहकांमधील नातं मजबूत होणार आहे. म्युचल फंड, बॅंक लॉकर, पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी केवायसी आवश्यक आहे.