नागरिकांनो तयार रहा कांदा महागणार आहे अशी चिन्हे

शनिवार, 29 जुलै 2017 (16:26 IST)

एशिया आणि आपल्या देशातील सर्वात मोठी असेलेली आणि  देशातील कांदा दर ठरवणारी, पुरवठा करणारी अशी   लसलगाव बाजरपेठेत मध्ये कांद्याचे भाव वाढत आहे.यामध्ये मुख्यतः दोन ते तीन आठवड्या पासून कांदा खरेदी किंमत वाढत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव २०  महिन्यांमधील किंमतीच्या तुलनेत वाढले आहेत. सध्या नवा कांदा अजून बाजारात आलेला नाही. शेतकऱ्याकडू  उन्हाळी कांदा  विक्री सुरु आहे. त्यामुळे एकदा का हा कांदा थांबला की पुढचे पिक येत नाही तो पर्यंत आडते आणि व्यापारी कांदा साठवणूक करतील आणि भाव वाढवतील , तर दुसरीकडे टोमॅटोचे भाव गेल्या ३ महिन्यात १०० रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.देशातील १७ मुख्य शहरांमध्ये पुरवठा कमी होत असल्याने टोमॅटोचे भाव ९० रुपयांच्या वर पोहोचले आहे.पाऊस आणि पूर यामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा