सध्या परवडणा-या घरप्रकल्पांसाठी आठ टक्के जीएसटी आकारण्यात येतोय. हा कर बांधकाम व्यावसायिकांना इनपुट क्रेडिटच्या बदल्यात वळता करून घेतला जाईल, असं आश्वासनही सरकारनं दिल आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना या घरांची विक्री करताना जीएसटी लावता येईलही. मात्र या घरांचा निर्मिती खर्च दाखवून त्यावर क्रेडिटचा दावा केला असेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष घराची विक्री किंमत कमी केली असेल, तरच तो आकारता येणार आहे.