लक्ष्मीपूजनपासूनच्या मुहूर्तावर नाशिक-पुणे विमानसेवा सुरु होणार

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली बहुप्रतीक्षित नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून एअर इंडीयाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरव्दारे येत्या २७ ऑक्टोबरपासून म्हणजेच लक्ष्मीपूजनपासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे दोन्ही प्रमुख शहरे हवाई मार्गाने परस्परांना जोडली जातील. सध्या अलायन्स एअरव्दारे नाशिकहून हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जात आहे.
 
सध्या रस्तेमार्गे पुण्याला जाण्यासाठी किमान पाच तासांचा वेळ लागतो. मात्र, विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच हे अंतर कापता येईल. या सेवेचे बुकिंग येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार ही सेवा सुरू राहणार आहे. ७० आसनी क्षमता असलेल्या या विमानात पन्नास टक्के जागा या ‘उडान’ योजनेंतर्गत राखीव असतील. उडान अंतर्गत १६२० रूपये तिकिट दर निश्चित करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती