नारायण मूर्तीच्या पाच महिन्यांचा नातवाला मिळणार 5 कोटी रुपये

रविवार, 21 एप्रिल 2024 (16:17 IST)
इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी अलीकडेच त्यांचा पाच महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्तीला कंपनीचे 15 लाख शेअर्स भेट दिले. आता कंपनीने शेअर्सवर लाभांश जाहीर केल्यास त्यांना मोठा फायदा होणार आहे. आयटी कंपनीने आपल्या शेअर्सवर 28 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे, या घोषणेमुळे पाच महिन्यांत एकाग्र च्या खात्यात सुमारे 4.20 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे.

मूर्ती यांनी त्यांच्या नातवाला 240 कोटी रुपयांचे 15 लाख शेअर्स गिफ्ट केले होते. भेटवस्तू म्हणून मिळालेल्या या शेअर्समुळे,एकाग्र अवघ्या पाच महिन्यांच्या वयात भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनीची सर्वात तरुण लक्षाधीश शेअरहोल्डर बनला.

एकाग्र कडे इन्फोसिसचे 15,00,000 शेअर्स आहेत. हा व्यवहार "ऑफ-मार्केट" करण्यात आल्याचे फाइलिंगमध्ये उघड झाले आहे. एकाग्र  रोहन मूर्ती, ज्याचा जन्म गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे झाला, हा नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा तिसरा नातू आहे. कृष्णा आणि अनुष्का ही त्यांची भावंडं आहेत. एकाग्र  हा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन यांचा मुलगा आहे, तर कृष्णा आणि अनुष्का या अक्षता मूर्ती आणि यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुली आहेत.

Edited By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती