राज्य सरकारकडून राज्यातील दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडून दुधाच्या दरात वाढ करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार दुधाच्या खरेदीदरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यात गाईच्या दुधाची खरेदी 24 रुपयांवरुन 27 रुपये एवढी करण्यात आली आहे. तर म्हशीच्या दुधाची खरेदी दर 33 रुपयांवरुन 36 रुपये एवढी करण्यात आली आहे.