Mercedes-Benz च्या या कारमध्ये 3.0-लीटर व्ही 6 बाइटर्बो इंजिन आहे. हे 287 किलोवॅट (390 हार्सपॉवर) ची शक्ती उत्पन्न करते. ही कार 4.7 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाची गती मिळवू शकते. यावर्षी भारतात लॉचं होणार्या मर्सिडिजची ही दुसरी कार आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये कंपनीने व्ही-क्लास बाजारात आणली होती. कंपनी यावर्षी 10 नवीन कार लॉचं करणार आहे.
या प्रसंगी मर्सिडिज-बेंज इंडियाचे एमडी व सीईओ मार्टिन श्वेंक म्हणाले की कंपनी आतापर्यंत भारतात आपल्या एएमजी उत्पादन धोरणात यशस्वी राहिली आहे. या अंतर्गत, कंपनीने 43, 45, 63 आणि जीटी श्रेणीमध्ये अनेक कार मॉडेल सादर केले आहे. ते म्हणाले की एएमजी जीएलई 43 सादर केल्यापासून आतापर्यंत एएमजी-43 श्रेणीबद्दल बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता आम्ही याच श्रेणीत एएमजी सी -43 4मॅटिक कूपे सादर करत आहोत. यासह एएमजी श्रेणी अंतर्गत कंपनीच्या देशात उपलब्ध मॉडेलची एकूण संख्या 15 झाली आहे. AMG C 43 4Matic Coupe ची शोरूम किंमत 75 लाखांवरून सुरू आहे.