आजच्या काळात भारतीय विवाहित महिला पारंपरिक तसेच आधुनिक दागिना असलेले मंगळसूत्र वापरतात. हा दागिना म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचे प्रतीक आहे. मंगळसूत्र हे स्त्रीचे प्रेमाचे , विवाहित असल्याचे प्रतीक असून ते स्त्रीमधील एकनिष्ठता, आत्मविश्वास दर्शविते.
याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, मंगळसूत्र महोत्सव हा नेहमीच भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये लक्षणीय महोत्सव ठरला आहे. हा पीएनजी ज्वेलर्स प्रस्थापित वार्षिक उपक्रम आहे. या महोत्सवात आम्हास नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो आणि आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या गरजा लक्षात घेता नेहमीच नावीन्यपूर्ण डिझाईन्स सादर करत असतो.