LPG Price Hike :महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे दर वाढले जाणून घ्या नवीन दर

गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (09:54 IST)
ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यामुळे आता एलपीजी सिलिंडर महाग मिळणार आहे. 
 
नवीन किमती 1 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून लागू झाल्या आहेत.19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही वाढ झाली आहे. कंपन्यांनी या एलपीजी सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढवली आहे. त्याचबरोबर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिल्ली ते मुंबई एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत.

दिल्लीत आता 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1652.50 रुपयांना उपलब्ध आहे. यापूर्वी ही किंमत 1646 रुपये होती. येथे भावात 6.50 रुपयांनी वाढ झाली आहे. हा सिलिंडर आता कोलकात्यात 1764.50 रुपयांना उपलब्ध आहे. येथे भावात 8.50 रुपयांनी वाढ झाली आहे. या सिलेंडरची नवी किंमत मुंबईत 1605 रुपये आणि चेन्नईमध्ये 1817 रुपये झाली आहे. 19 किलो LPG गॅस सिलेंडरची जुनी किंमत कोलकात्यात 1756 रुपये, मुंबईत 1598 रुपये आणि चेन्नईमध्ये 1809.50 रुपये होती.

विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. हा सिलिंडर दिल्लीत 803 रुपयांना उपलब्ध आहे
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती