रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडा, प्रवाशांना आवाहन

शुक्रवार, 7 जुलै 2017 (08:40 IST)

स्वयंपाक गॅसवरील सबसिडी प्रमाणे  रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे. मात्र स्वयंपाकाच्या गॅससारखेच रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडणं हे प्रवाशांसाठी ऐच्छिक असणार आहे, असंही रेल्वेनं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

पुढच्या महिन्यापासून रेल्वेकडून नवी योजना लागू केली जाणार असून, योजनेंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये प्रवाशांना सबसिडी सोडता येणार आहे. रेल्वेला होणारी नुकसानभरपाई भरून निघावी, यासाठीच रेल्वेकडून असं आवाहन करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेला सद्यस्थितीत हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. प्रवाशांनी ऑनलाइन आणि रेल्वे तिकीट खिडकीवरून बुकिंग करणाऱ्या तिकिटांवरील सबसिडी सोडल्यास रेल्वेला त्याचा फायदा होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा