मराठा उद्योजकांना कर्ज देण्यास KDCC बँकेने दुजाभाव करू नये नरेंद्र पाटील

शनिवार, 4 मार्च 2023 (08:10 IST)
Instagram
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राजे विक्रमसिंह घाटगे बँकेतून कर्ज सहाय्य केले जाते.जर राजे बँकेला हे जमतं , तर केडीसी बँकेला का जमत नाही? असा सवाल महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी   केला.केडीसीसी बँकेने पक्षपात आणि दुजाभाव करू नये, असेही पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी बँकेचे काम मोठं आहे. विक्रमसिंह घाटगे बँकेच्या 9 शाखेतून 1 हजार मराठा तरूणांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.जिल्ह्यातील इतर बँकांकडून नावापुरते काही लोकांना कर्ज पुरवठा केला जातो. 117 शाखा असणाऱ्या केडीसीसीच्या बँकेनं फक्त 1 हजार मराठा तरुणांना कर्ज दिलं.तर 9 शाखा असणाऱ्या विक्रमसिंह घाटगे बँकेतून 1 हजार मराठा तरुणांना कर्जपुरवठा दिला. केडीसीसी बँक जाणीवपूर्वक मराठा समाजाची योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कमी पडतेय.मराठा उद्योजकांना कर्ज देण्यास केडीसीसी बँकेने पक्षपात,दुजाभाव करु नये असेही ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती