Hurun Rich List 2022: जगातील टॉप-10 श्रीमंतांमध्ये रिलायन्सचे मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय, जाणून घ्या किती संपत्ती
गुरूवार, 17 मार्च 2022 (19:15 IST)
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आणखी एक यश संपादन केले आहे. ते जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहे. विशेष म्हणजे या यादीत स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय अब्जाधीश आहेत.
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट-2022 नुसार, ते जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत 9व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती $103 अब्ज आहे. त्यांनी केवळ सर्वात श्रीमंत भारतीय होण्याचा मान मिळवला आहे असे नाही तर आशिया खंडात त्यांची संपत्ती 24 टक्क्यांनी वाढली आहे. RIL च्या CMD ने सर्वात श्रीमंत दूरसंचार उद्योगपतीचा किताबही पटकावला आहे.
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट-2022 मध्ये असे म्हटले आहे की RIL चे CMD मुकेश अंबानी यांनी त्यांचा वारसा अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला आहे आणि वाढवला आहे. याच आधारावर त्यांनी 20 वर्षात आपली संपत्ती 10 पटीने वाढवली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता $103 अब्ज आहे, जी 2002 मध्ये $10 अब्ज होती.