Gold-Silver Price Today: सोनं, चांदीचे भाव घसरले, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ

गुरूवार, 27 मे 2021 (15:37 IST)
बाजारात आज सोनं, चांदीच्या किंमतीत बदल बघायला मिळत आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनप्रमाणे 27 मे रोजी सकाळी 24 कॅरेट सोन्याचई किंमतीत 162 रुपये घसरण बघायला मिळाली तर चांदी देखील 930 रुपये स्वस्त झाली आहे.
 
इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन प्रमाणे गुरुवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत 49033 रुपये प्रति 10 ग्राम तस 999 शुद्धता असलेली 1 किलो चांदीची किंमत 70936 एवढी आहे.
 
सोन्याच्या किमती दोन महिन्यात तोळ्यामागे 5 हजार रुपयांनी वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी तेजी येण्याची शक्यता आहे म्हणून या काळात एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते काही ‍दिवसात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागणार आहे. अशात भविष्यात सोन्याचे दर 50 हजारांपेक्षा जास्त होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्याचा विचार करत असणार्‍यांसाठी ही वेळ योग्य आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती