Gold Price Down:डॉलरचा निर्देशांक गुरुवारी 19 वर्षांच्या उच्चांकी 109.30 वर गेल्याने सलग पाचव्या आठवड्यात सोन्याच्या किमती कमी झाल्या.मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.शुक्रवारी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 158 रुपयांनी घसरून 50,070 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्टमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 158 रुपये किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 50,070 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
सध्या चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे.चांदीची देशांतर्गत वायदा किंमत 55,000 रुपये प्रति किलोच्या खाली आली आहे .सध्या जागतिक बाजारात सोने 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे.बाजार विश्लेषकांनी सांगितले की, सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती घसरल्या.जागतिक पातळीवर, न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.31 टक्क्यांनी घसरून 1,700.50 रुपये प्रति औंस झाला.