सोनं-दरात घसरण चांदी

शनिवार, 2 जून 2018 (09:10 IST)

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर धांतुंच्या किमतीत सुरु असलेला चढ-उतारामुळे आणि मागणीत घट झाल्याने सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाली तर चांदीच्या दरातही ४५० रुपयांनी घट झाली आहे. घट झाल्याने सोन्याचा दर ३१,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात ४५० रुपयांनी घट झाल्याने ४०,६०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये सोनं ०.२३ टक्क्यांनी घट झाल्याने तो १,२९७.३० डॉलर प्रति औंस झाला आहे. तर, चांदीमध्येही ०.५८ टक्क्यांनी घट झाल्याने १६.३९ डॉलर प्रति औंस झाला आहे. याआधी गुरुवारी सोन्याच्या दरात ९० रुपयांनी घट झाली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती