तिकिट कन्फर्म झाले की नाही, आधीच माहीत पडेल IRCTC च्या नवीन वेबसाइटवर

रेल्वेचे तिकिट बुक करणार्‍या परवशांना नेहमी कन्फर्म तिकिट मिळेल असे होत नाही यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर अंदाज दर्शवणारी सेवा सुरू होत आहे ज्याने परवशांना तिकिट कन्फर्म होण्याची कितपत शक्यता आहे याचा अंदाज येईल.
 
हे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआरआयएस) द्वारे विकसित नवीन एल्गोरिद्मवर आधारित असेल.
 
रेल मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यानी सांगितले की 'प्रतीक्षा सूची बद्दल अंदाज लावणार्‍या नवीन फीचरनुसार बुकिंग ट्रेंडच्या आधारावर तिकिट कन्फर्म होण्याच्या शक्यतेचा अंदाज बांधता येईल. आम्ही पहिल्यांदा आपल्या पॅसेंजर ऑपरेशन आणि बुकिंग पॅटर्नचा डेटा माइन करणार. जुन्या आकड्याच्या संग्रहाचे विश्लेषण करून नवीन सूचना मिळवण्याच्या प्रक्रियेला डेटा माइनिंग म्हणतात.
 
हा विचार रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांचा होता. ही सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी एक वर्ष वेळेची मर्यादा दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती