मिळालेल्या माहितीनुसार अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यावर्षी अक्षय्य तृतीयेचा सण ३० एप्रिल रोजी येत आहे. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते. अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईमुळे सोन्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. जर तुम्हीही या अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे स्वस्त सोने खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.
सोने आणि चांदीचे नवीनतम दर
सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या पुढे गेला. पण आज किमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. आजच्या किमतींनुसार, सोने खरेदी करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
तसेच देशातील विविध शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या किमती ६०० रुपयांपेक्षा जास्त कमी झाल्या आहे. त्याच वेळी, देशातील विविध राज्यांमध्ये २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीतही घसरण झाली आहे.
तसेच हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी करणे, दान करणे आणि कोणतेही शुभ कार्य सुरू करणे हे शाश्वत फळ देते असे मानले जाते. पौराणिक ग्रंथांनुसार, सोने हे समृद्धीचे प्रतीक आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोन्याची मागणी लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे.