विना अनुदानित सिलिंडरच्या किमतीत ८६ रुपयांनी वाढ

गुरूवार, 2 मार्च 2017 (09:08 IST)
तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने  विना अनुदानित सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. १ मार्च २०१७ पासून विना अनुदानित सिलिंडरसाठी नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८६ रुपयांनी वाढ झाली आहे. ‘१ मार्च २०१७ पासून बिगर अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये ८६ रुपयांची वाढ होणार आहे. जागतिक स्तरावर एलजीपी संबंधित उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या दरवाढीचा अनुदानित सिलिंडर वापरकर्त्यांना कोणताही फटका बसणार नाही,’ असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा