ते म्हणाले, मे महिन्याच्या आठवड्यात हा प्रकल्प सुरु करण्याचा विचार आहे. स्विगी ड्रोन द्वारे 'डार्क स्टोअर्स' मध्ये किराणा सामान पोहोचवणार. येथून स्विगी डिलिव्हरी करणारी व्यक्ती ते पॅकेट उचलून ग्राहका पर्यंत नेऊन देणार.
सध्या $250 दशलक्ष मूल्य असलेले, गरुड एरोस्पेस हे भारतातील सर्वात मौल्यवान ड्रोन स्टार्टअप आहे. 2024 पर्यंत 1,00,000 स्वदेशी मेड इन इंडिया बनवण्याचा एका भव्य योजनेसह ड्रोन आणि ड्रोन तंत्रज्ञान सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.