या राज्यातील कर्मचार्‍यांसाठी सरकारने महागाई भत्त्यात 5% वाढ केली

सोमवार, 2 मे 2022 (12:50 IST)
छत्तीसगड सरकारने रविवारी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेल्या महागाई भत्त्याच्या (डीए) दरात पाच टक्के वाढ जाहीर केली. आत्तापर्यंत 17 टक्के असलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीनंतर मूळ वेतनाच्या 22 टक्क्यांवर पोहोचला आहे.
   
राज्य सरकारच्या निर्णयाची घोषणा करताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटरवर सांगितले की, “कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ जाहीर करतो. नवीन दर 1 मे पासून लागू होतील,” भूपेश बघेल यांनी हिंदीत ट्विट केले. या घोषणेचा फायदा 4 लाख सरकारी कर्मचारी आणि 1.25 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
   
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये छत्तीसगड सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी डीए दर 12 टक्के होता, तो वाढवून 17 टक्के करण्यात आला आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती