मागणी असूनही, मारुती-ह्युंदाई वाहनांची विक्री घटली, टाटा मोटर्सच्या विक्रीत वाढ

सोमवार, 2 मे 2022 (18:41 IST)
मागणी असूनही एप्रिलमध्ये मोठ्या वाहन कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. मारुती सुझुकी इंडियाची देशांतर्गत विक्री एप्रिल 2022 मध्ये 7 टक्क्यांनी घसरून 1,32,248 युनिट्सवर आली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीने एकूण 1,42,454 वाहनांची विक्री केली होती. या कालावधीत, त्याच्या अल्टो आणि एस-प्रेसो सारख्या मिनी कारची विक्री 32 टक्क्यांनी घसरून 17,137 युनिट्सवर आली आहे. स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर सारख्या कॉम्पॅक्ट कारची विक्री 18 टक्क्यांनी घसरून 59,194 युनिट्सवर आली आहे.
 
युटिलिटी वाहनांच्या विक्रीत 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत प्रतिस्पर्धी ह्युंदाईची एकूण घाऊक विक्री 10टक्क्यांनी घसरून 44,001  युनिट झाली. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये एकूण 49,002 वाहनांची विक्री केली.
 
 
देशांतर्गत ऑटो प्रमुख टाटा मोटर्सने एप्रिलमध्ये एकूण 72,468 वाहनांची विक्री केली. हा आकडा एप्रिल 2021 मध्ये विकल्या गेलेल्या एकूण 41,729 वाहनांपेक्षा 74 टक्के अधिक आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, तिच्या देशांतर्गत विक्रीतही 81 टक्के वाढ झाली आहे.
 
टोयोटाच्या विक्रीत 57 टक्के वाढ झाली: कंपनीच्या वाहनांची विक्री 57% वाढून 15,085 युनिट्सवर पोहोचली. एप्रिल 2021 मध्ये 9,600 वाहनांची विक्री झाली. स्कोडा ची विक्री 5 पट वाढली:.वाहनांची विक्री 5 पटीने वाढून 5,152 युनिट्स झाली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती