सध्या बाजारात नवीन कांदा आला आहे. पावसामुळे कांदा खराब झाल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे भाव 20 -30 रुपये प्रतिकिलो आहे. तर किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 40-50 रुपये किलो आहे. आणि या दराने विकला जात आहे. त्या मुळे अवकाळी पावसामुळे तोडणीला आलेला कांदा खराब झाल्यामुळे कांद्याचे दर वाढत राहणार अशी शक्यता व्यापारी वर्ग वर्तवत आहे. कांद्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्याला कांदा रडवणार असल्याचे दिसत आहे.