आता रेशन दुकानात भरता येईल वीज-पाण्याची बिले

बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (16:21 IST)
मोदी सरकारच्या अन्न व पुरवठा मंत्रालयाने एक नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानांतून आता वीज, पाणी अणि इतर सुविधांची बिले भरण्याची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. याबाबत अन्न व पुरवठा मंत्रालयाने यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडशी एक करार केला आहे. या करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
 
हा करार केल्याने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानांतून मोदी सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत गरिबांना स्वस्त किंमतीत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या योजनेमध्ये 80 कोटी जणांना अन्न सुरक्षाचा लाभ दिला जातो आहे. दरम्यान आता सगळ्यांना नव्या सुविधांचा लाभ घेता यावा या माध्यमातून नागरीकांना सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर दुकानदारांनाही नवीन व्यवसाय मिळणार आहे.
 
अन्न व पुरवठा मंत्रालय आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसच्या करारानुसार
आता स्वस्त धान्य दुकानात वीज, पाणी बिलासोबतच पॅन नंबर आणि पासपोर्टचे अर्ज दाखल करण्या़साठीही मुभा देण्यात आली आहे.
तसेच निवडणूक आयोगाशी संबंधित सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत.
यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी अशा गोष्टी करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे याबाबत करार करण्यात आला आहे.
तर या करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव यांनी सह्या केल्या आहेत.
त्यावेळी अन्न व पुरवठा सचिव सुधांशू पांडेय आणि सीएससीचे दिनेशकुमार त्यागी उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती