मोठी बातमी! ZEE एंटरटेनमेंट, सोनी पिक्चर्सनेटवर्क्स इंडियामध्ये विलीन होण्यासाठी मंडळाने मान्यता दिली, पुनीत गोयंका कंपनीचे एमडी आणि सीईओ
झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया यांच्यातील विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसच्या संचालक मंडळाने ZEEL आणि SPNI (सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया) यांच्यातील कराराला मंजुरी दिली आहे. या विलीनीकरणाबाबत, मंडळाचा विश्वास आहे की हे विलीनीकरण शेयरधारकांसाठी खूप चांगले सिद्ध होईल.
झी बिझनेसच्या मते, ZEEL ने रणनीतीणीच्या लाभाला लक्षात ठेऊन दक्षिण आशियातील एक लिडिंग मीडिया आणि मनोरंजन कंपनी विलीन केली आहे. आता हे विलीनीकरण पूर्णतः कार्यान्वित करण्यासाठी ZEEL व्यवस्थापन कार्य करेल. या कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर पुनीत गोयंका कंपनीचे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहतील. या विलीनीकरणासाठी विशेष गुंतवणूक रणनीती देखील तयार करण्यात आली आहे.
माहितीनुसार, या विलीनीकरणानंतर, सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट $ 1575 दशलक्ष (सुमारे 11,605 कोटी रुपये) गुंतवणार आहे. या गुंतवणूकीची रक्कम वाढीसाठी वापरली जाईल आणि विलीनीकरणानंतर सोनी एंटरटेनमेंट बहुसंख्य शेयरधारक असेल. दोन्ही पक्षांमध्ये एक नॉन-बाइंडिंग टर्म शीटवर स्वाक्षरी झाली आहे.पुढील व्यवहार 90 दिवसात केले जातील.
झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांच्यामध्ये या विलीनीकरणानंतर, कंपन्यांमधील भागिदारीबाबत अनेक बदल होणार आहेत. असे सांगितले जात आहे की यानंतर ZEEL च्या भागधारकांचा वाटा सध्याच्या परिस्थितीत 61.25% असेल. तर सोनीद्वारे 1575 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतर भागीदारीत बदल होईल. या गुंतवणूकीनंतर, ZEEL च्या गुंतवणूकदारांचा हिस्सा सुमारे 47.07% असेल आणि सोनी पिक्चर्सच्या भागधारकांचा हिस्सा 52.93% असण्याची शक्यता आहे.