पाकिस्तानी सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीच्या संचालक यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्याला फोन करून, 'तुम्ही अजून जागे आहात का' असे विचारले. यानंतर ''मी फ्लाईट निरिक्षण करत आहे. विमान यशस्वीरित्या दिल्लीला उतरले आहे. तुम्हाला शब्द दिलेला. ईद मुबारक'', असा संदेश दिला.
यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्याने फोनवर 'शब्द दिलेला, ईद मुबारक', असे सांगत हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी खुले झाल्याचा संदेश दिला.
भारताहून कोणतेही विमान युरोप-अमेरिका किंवा खाडी देशाकडे जातं तेव्हा पाकिस्तानाच्या 11 मार्गांहून प्रवेश करु शकतं. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशीच पाकिस्तानने 11 एन्ट्री पॉईंट बंद केले होते. यामुळे दक्षिण आशिया आणि पाश्चिमात्या देशांकडे जाण्यासाठी विमानांना वळसा घालून जावे लागत होते. तीन महिन्यांनंतर पाकिस्तानने पहिला टेलेम पॉईंट खुला केला. या मार्गावरून विमान भारतात पोहोचले. हा मार्ग खुला झाल्यानंतर सर्वप्रथम ऐतिहादच्या विमानाने रविवारी संध्याकाळी 5.34 वाजता अबुधाबी-दिल्ली उड्डाण केले.