सध्या बँकिंग फसवणुकीच्या घटना घडणे हे सामान्य झाले आहे.देशातील विविध ठिकाणाहून दररोज बँकिंगच्या फसवणुकीची प्रकरणे बाहेर येत आहे.ही बँकिंग फसवणूक थांबविण्यासाठी देशातील सर्व बँका वेळोवेळी ग्राहकांना सूचना देतात.या साठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे.अलीकडील काळात बँकिंग फसवणुकीत चेक किंवा धनादेश फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.चेकमधून फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पॉझिटिव्ह पे प्रणाली सुरु केली आहे.
1 रिक्त धनादेश वर सही करू नका- चेक वर ज्या व्यक्तीला चेक देत आहात,त्याचे नाव,रक्कम,आणि तारीख लिहा.रिकाम्या चेकवर कधीही सही करू नका.चेकवर लिहिण्यासाठी नेहमी पेनचा वापर करा.