यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात. बघा, मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी , शेवटी आतून त्या एकच असतात, त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते. याचा अर्थ असा कि, आजच्या या डिजिटल युगात आपण बँकांना मूर्ख बनवू शकत नाही. (आता काही जण मल्ल्याचं नाव घेऊन, उलट सुलट चर्चा करतील, पण तशा केसेस वेगळ्या असतात). बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते.
CIBIL score कसा सुधारेल?
EMI वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका.
कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट ) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत, ही शिस्त सांभाळा. एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या.
NA - No Activity
NH - No History
असे पर्याय दिसू शकतात.
तर काय करा कि, एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा, अशा प्रकारे CIBIL मध्ये आपली History तयार होईल.
बँकींग सिस्टीम कशी काम करते ? याबाबत आपल्या मराठी पोरांमध्ये बऱ्यापैकी जागृती नाही , आपण बँकांना , त्यांच्या मॅनेजर्सला कर्ज का देत नाहीस ? म्हणून धारेवर धरतो. बँकेसमोर बँड वाजवतो, आंदोलनं करतो, धरणे देतो. पण राजे हो, कर्ज मिळण्या पाठीमागे एवढा सगळा पसारा असतो. इथे सबकुछ CIBIL असतं. त्याच्या बाहेर जाऊन कोणतीही बँक कर्ज देणार नाही. म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज, बुडवू तर नकाच, परंतु वेळेत फेडा ! नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही.