WhatsApp वर कोरोना वॅक्सीन सर्टिफिकेट कसे प्राप्त करावे

सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (15:41 IST)
कोरोना लस घेणाऱ्यांना आता काही सेकंदात व्हॉट्सअॅपवर लसीकरण प्रमाणपत्र सहज मिळेल. यासाठी तुम्हाला तीन सोप्या स्टेप्स पूर्ण कराव्या लागतील. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या कार्यालयाने रविवारी ट्विटरवर ही माहिती दिली. सध्या लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लोकांना COVIN पोर्टल ला भेट द्यावी लागते.
 
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर +91 9013151515 सेव्ह करावे लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप उघडा. चॅट बॉक्सवर जा आणि 'कोविड प्रमाणपत्र' टाइप करा. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी मिळेल. हा OTP व्हॉट्सअॅप चॅट बॉक्समध्येच टाईप करा आणि पाठवा.
 
जर तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या लसीकरणाच्या वेळी समान नंबर दिला असेल तर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सदस्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती