स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून लागू

मंगळवार, 31 मार्च 2020 (17:36 IST)
महाराष्ट्रात येत्या वर्षभरासाठी चार शहरांमध्ये स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून लागू होणार आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका आणि नागपुर या शहरांमध्ये ही स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत लागू राहील. सध्याची मालमत्ता नोंदणीसाठी आकारली जाणाऱ्या ६ टक्के स्टॅम्प ड्युटीएवजी आता ५ टक्के स्टॅम्प ड्युटी अदा करावी लागेल. येत्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही स्टॅम्प ड्युटीमधील सवलत लागू असेल. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार ही स्टॅम्प ड्युटी १ एप्रिलपासून लागू होणे अपेक्षित होते. पण करोनाच्या संकटामुळे आता या स्टॅम्प ड्युटीतील अंमलबजावणीलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
सवलतीनंतरच्या ५ टक्के स्टॅम्प ड्युटीमध्ये ४ टक्के स्टॅम्प ड्युटी आणि १ टक्के मेट्रो सेसचा समावेश असेल. त्यामुळे नवीन घर खरेदी करणाऱ्यांना ६ टक्क्यांएवजी अवघी ५ क्के स्टॅम्प ड्युटी मोजावी लागेल. एखाद्या नवीन मालमत्ता खरेदीच्या काळात स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत हा मोठा दिलासा ग्राहकासाठी असेल. काही दिवसांपूर्वी रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. विकासकांच्या शिष्टमंडळाने ५० टक्के स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मागितली होती. सरकारी पातळीवर विकासकांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतल्याने रिअल इस्टेट क्षेत्रासमोर असणाऱ्या अडचणीवर तोडगा निघाल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले. या सवलतीमुळे आता येत्या दिवसात घरांच्या विक्रीमध्ये बदल होण्याचे संकेत त्यांनी दिले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती