बनावट नोटांचा आरबीआयकडे तपशील नाही!

नोटीबंदीनंतर बनावट नोटांचा शोध लावणे सोपे होईल, असा दावा सरकारने केला होता. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नोटाबंदीनंतर जमा झालेल्या बनावट नोटांची आकडेवारीच नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आणली आहे.
 
8 नोव्हेंबर 2016 ते 10 डिसेंर 2016 पर्यंत रद्द केलेल्या नोटांमधून किती बनावट नोटा मिळाल्या, त्या कोणत्या बँकेतून मिळाल्या, एकूण बनावट नोटा, नोटांचे मूल्य आणि दिनांक याची माहिती द्यावी. अशा अर्ज अनिल गलगली यांनी केला होता. मात्र, आरबीआयकडे सध्या नेमका आकडा नसल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा