आजपासून या नियमांत बदल जुलै महिना अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक बदल घेऊन येईल.काही कर आकारणी, शेअर बाजार आणि कामगार नियमांमधील सुधारणा 1जुलैपासून लागू होतील. क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर झालेल्या भांडवली नफ्यावर कर लादण्यात येणार आहे. सरकारने आधीच क्रिप्टो उत्पन्नावर भांडवली लाभ कर लावला आहे.
दर महिन्याला तुमच्या खिशाशी संबंधित काही बदल होत राहतात. जुलै महिना अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक बदल घेऊन येईल. तुमचा पॅन-आधार लिंक करण्यापासून, डीमॅट खात्याचे केवायसी आणि एलपीजी सिलिंडरची किंमत यामध्ये अनेक बदल होणार आहेत.
आजपासून एकेरी प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर बंदी असणार आहे. तर यासह ऑनलाइन प्लॅटपॉर्मवरून पूड ऑर्डर करताना आता खाद्यपदार्थांच्या दर्जाची माहिती देणं बंधनकारक असणार आहे. यासोबतच दुचाकी आणि एसी घेणं महाग होणार आहे. याशिवाय आता भेटवस्तूंवर 10 टक्के टीडीएस लागू करण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. हा कर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि डॉक्टरांनाही लागू होणार आहे. यासोबतच प्रत्येक व्यवहारावर 1 टक्के टीडीएस लागू करण्यात आला.