वेगाने वाढतोय कोरोना, केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना जाहीर, नियमावली जाणून घ्या

गुरूवार, 30 जून 2022 (15:08 IST)
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात केंद्र सरकारने कोरोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे- 
 
संशयित आणि पुष्टी झालेल्या कोरोना रुग्णांची लवकर तपासणी, चाचणी आणि त्यानंतरच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दक्षता आवश्यक आहे. यासाठी सर्व राज्यांना सुरक्षिततेची रणनीती बनवून संसर्ग रोखावा लागेल. 
लवकरात लवकर कोरोना रुग्णांची ओळख पटवणे, तत्काळ चाचणी करणे आवश्यक.
कोरोनाच्या व्हेरिएंटवरही दीर्घकाळ लक्ष ठेवावे लागणार आहे.
राज्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवावे आणि त्यापैकी काहींची आरटीपीसीआर चाचणीही केरावी.
सर्व नमुने जीनोम सिक्‍वेंसिंग पाठवावे.
प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आयसोलेशन आणि उपचारासाठी तातडीने लक्ष द्यावे.
संसर्ग पसरू नये याचे व्यवस्थापन केले पाहिजे.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय आणि इतर आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी.
जर त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास उपचारासोबतच कोरोना पसरू नये, यासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे.
स्थितीवर लक्ष राखून ठेवणे महत्त्वाचे आहे.
मार्गदर्शक सूचनांचे सर्व जिल्ह्यांमध्ये पालन केले जावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती