सरकारचा मोठा निर्णय,प्रत्येक कुटुंबाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत

रविवार, 5 जून 2022 (14:18 IST)
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रत्येक कुटुंबाला म्हणजे प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा निर्णय घेतला, त्यानंतर आता त्याचा लाभ लोकांना मिळत आहे.केंद्र सरकार ने उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडर वर 200 रुपये सबसिडी दिली. आता गोवा सरकारने सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. 
 
पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेत गोवा सरकारने भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील प्रत्येक कुटुंबाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 
 
एका ट्विटमध्ये याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार नवीन आर्थिक वर्षापासून तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना मंत्रिमंडळाने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गोव्यात गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात पक्ष म्हणजेच भाजपची सत्ता आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी तीन एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील, असे आश्वासन दिले होते. 
 
यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना लोहखनिजाचे उत्खनन पुन्हा सुरू करणे आणि रोजगार निर्मिती हे सध्याच्या कार्यकाळात आपले प्राधान्य असल्याचे सांगितले.
 
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर 2019 मध्ये प्रमोद सावंत यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 40 सदस्यांच्या सभागृहात 20 जागा जिंकल्या. सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती