Bentley ने भारतात सर्वात वेगवान लक्झरी एसयूव्ही 2021 Bentayga लाँच केली, जाणून घ्या फीचर्स

मंगळवार, 16 मार्च 2021 (22:11 IST)
ब्रिटिश कार निर्मिते बेंटली यांनी आपली Bentayga SUVचा फेसलिस्ट अवतार भारतात लॉन्च केला आहे. 2021Bentley Bentayga SUV ला भारतात 4.10 कोटी रुपयांमध्ये (एक्स शोरूम)दिल्ली च्या बाजारात आणले आहे. कंपनी ने या कारची बुकिंग देखील सुरु केली आहे ही बुकिंग दिल्ली, मुंबई आणि हैदराबादच्या सेल्स टीम च्या मदतीने बुक केले जाऊ शकते.
 
Bentayga ही जगातील सर्वात वेगवान लक्झरी एस यूव्ही आहे. इंजिन आणि पॉवर बद्दल सांगायचे तर या एसयूव्ही मध्ये  4.0-लीटर ट्वीन टर्बो चार्ज V8 इंजिन लावले आहेत जे 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ने सुसज्ज आहे. या कार चे इंजिन 542 bhp च्या मॅक्सिमम पॉवर आणि 770 Nm च्या पीक टार्ट जनरेट करण्यात पूर्णपणे सक्षम आहे. ही एसयूव्ही 290 kmph च्या वेगाने धावू शकते. ही कार सहजपणे 0ते 100 kmph च्या वेगाने केवळ 4.5 सेकंदात वेग पकडते.
 
बेंटली ने या कारच्या डिझाईन मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले नाही. 2021 Bentayga SUV मध्ये डार्क टिंटेड डायमंड ब्रश्ड अल्युमिनियम फिनिश देण्यात आले आहे. या कारची मेट्रिक्स ग्रील पूर्वीपेक्षा मोठी आहे. या कारच्या फ्रंट मध्ये आपल्याला LED मेट्रिक्स हेडलॅम्प देखील देण्यात आले आहेत. या कार मध्ये हिंडेड विंड स्क्रीन देण्यात आली आहे. या विंड स्क्रीनवर वेट-आर्म वायपर देण्यात आले आहेत. जे प्रथमच कारमध्ये समाविष्ट केले आहे. कारच्या दोन्ही बाजूस 22 वॉशर जेट देण्यात आले आहे. कारच्या मागील बाजूस बोलावे तर या मध्ये रुंद टेल गेट आणि नवीन टेल लाईट देण्यात आली आहे. 
 
वैशिष्ट्यांविषयी बोलताना, 2021 बेंटयागा एसयूव्ही मध्ये अधिक लेगरूम असलेल्या सीट्स देण्यात येणार आहे जे पूर्वीपेक्षा अधिक सुविधा आणि आराम देतील. या कार मध्ये दिली जाणारी सर्वात मोठी ऑफर आहे ती आहे याचे 10.9-इंचाचे इंफोटेनमेंट सिस्टम. या सह कार मध्ये वायरलेस एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो स्टॅंडर्ड फीचर्स च्या रूपात कार मध्ये देण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती