संपूर्ण महाराष्ट्राचा आपला मराठी माणूस शिव ठाकरे व्यवसायात उतरला असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत होत्या. त्याने सामान्य माणसांसाठी बी रियल नामक डीओड्रंट ब्रांड लवकरच घेऊन येत असल्याचे देखील सांगितले होते. त्याप्रमाणे रविवारी पुणे येथे शिव ठाकरेने त्याच्या काही मित्रापरीवारांच्या उपस्थितीत डीओड्रंट ब्रांडचे उद्घाटन केले. ह्या कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी सुरेखा ताई पुणेकर यांची मुख्य उपस्थिती लाभली. शिवाय, रोडीज कलाकार अपूर्वा गोळे, संजय नेगी, शरण शोभानी, संजय नेगी, अर्चिस पाटील तसेच डीआयडी फेम शिवानी पाटील आणि लावणी सम्राज्ञी विनर मीनाक्षी पोशे या सर्व कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. ह्या सर्वांनी आपापल्या कला सादर करत कार्यक्रमात रंग ओतला. इतकेच नव्हे तर, सुरेखा पुणेकर ह्यांच्या ठसकेदार लावणीची झलक या सर्व मंडळींना अनुभवायला मिळाला.
बी रियल हा डीओ केवळ उच्चवर्गीयांसाठी किंवा ऑफिस मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी नव्हे तर, खास करून कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात आला असल्याचे शिव सांगतो. आपण सगळी मेहनत करून वर आलेली मनसे आहोत, केवळ ऑफिस मध्ये बसणारी लोकंच दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डीओड्रंट वापरत असतात, रस्त्यावरचा फेरीवाला, भाजीवाला पासून ते कामवाली बाई देखील दिवसभर मेहनत करत असते. त्यांना देखील फ्रेश राहण्याचा हक्क आहे. माझा डीओड्रंट त्यांच्या मेहनतीला यश भलेही मिळवून देणार नाही, पण त्यांच्या कामात त्यांना ताजेतवाने ठेवण्यास नक्कीच मदत करू शकतो. असे शिव ठाकरेने सांगितले.