आरबीआयने नुकतीच सर्व राज्यांनुसार सुट्ट्यांची लिस्ट प्रचलित केली आहे. मे महिन्यात बँक चक्क 12 दिवस बंद असणार आहे. एप्रिल संपत आला आहे. जर तुम्हाला काही कामे ठरवायची असतील तर त्याचे प्लॅनींग करू शकतात पुढच्या महिन्यासाठी, कारण मे महिन्यात या वेळेस चक्क 12 दिवस बँकांना सुट्टी असेल. आरबीआयने प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्यांची लिस्ट प्रचलित केली आहे.
मे महिन्यामध्ये बँकांना अनेक दिवस सुट्टी असणार आहे. देशातील मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने नुकतीच सुट्ट्यांची यादी प्रचलित केली आहे. यामध्ये मे 2024 मध्ये बँक 14 दिवस बंद राहतील असे दाखवले आहे. तसेच सर्व रविवारचा यामध्ये समावेश असणार आहे. व दुसरा आणि चौथा शनिवार वगळला आहे. व येणार्या मे महिन्यामध्ये अक्षय तृतीय, रवींद्रनाथ टागोर यांची जयंती तसेच अनेक सण-उत्सव आहेत. यामुळे बँक बंद राहतील. पण सुट्टी असतांना ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु राहील. तसेच तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्ही ATM ने काढू शकतात किंवा E सेवा केंद्रामधून देखील काढू शकाल. ऑनलाईन पद्धतीने सर्व व्यवहार केले जाऊ शकतील. तर चला पाहूया कोणत्या कोणत्या तारखेला असेल सुट्टी
1 मे 2024- कामगार दिन निमित्त महाराष्ट्रातील बँक बंद असतील
5 मे 2024- रविवार असल्या कारणाने देशभरात बँकांना सुट्टी राहील.
7 मे 2024- देशातील ज्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणूक असेल तेथील स्थानिक बँकांना बंद राहतील.
8 मे 2024- रवींद्रनाथ टागोर जयंती, यामुळे अनेक राज्यांमध्ये स्थानिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
10 मे 2024- अक्षय तृतीया, निमित्त बँकांना सुट्टी राहील.
13 मे 2024- ज्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणूक असणार तेथील स्थानिक बँकांना सुट्टी असेल.
11 मे 2024- दुसरा शनिवार
12 मे 2024- रविवार असल्याने देशभरात बँकांना सुट्टी असणार आहे.
16 मे 2024- राज्य दिवस
19 मे 2024- रविवार असल्याने देशभरात बँकांना सुट्टी असणार आहे.
20 मे 2024- मुंबई, नवी मुंबई, उपनगर लोकसभा निवडणुकीमुळे बँक बंद राहतील.
23 मे 2024- बुद्ध पौर्णिमा
25 मे 2024- चौथा शनिवार आहे व बँकांना सुट्टी राहील.
26 मे 2024- रविवार असल्यामुळे देशभरात बँकांना सुट्टी राहील.