आता बँकेतील घोटाळे उघड होत आहेत. असाच एक घोटाळा उघड झाला आहे.बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे.उद्योगपती अमित सिंगला आणि अन्य व्यक्तींविरोधात थकीत कर्जा प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रने सीबीआयकडे एफआयआर नोंदवला आहे. आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून 9.5 कोटींचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न झाल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे आता बँक चर्चेत आली आहे.
तर दुसरीकडे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेत महाघोटाळा झाला आहे. राजधानी दिल्ली येथे सीबीआयनं एका हिरे व्यापऱ्याविरोधात फसवणूकीची केस दाखल केली आहे. सीबीआयनं कथित महाघोटाळ्याप्रकरणी द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे. त्यामुळे बँका आहेत की घोटाळ्याचे कुरण असा प्रश्न समोर आला आहे.