नीरवच्या वकिलांप्रमाणे तर हे पूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत करण्यात आले आहे. हे प्रकरण गाजवण्यात येत असून नीरव सध्या व्यवसायच्या कामानिमित्त परदेशात असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याप्रमाणे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाहीये. मीडियाप्रमाणे ईडीने 5600 कोटी रुपये जप्त केले अर्थात रक्कम वसूल झालेली आहे तर ती रक्कम पीएनबीला देऊन द्याला हवी. यापूर्वी नीरव यांनी स्वत: आपला पक्ष मांडत पंजाब नॅशनल बँकेला यासंदर्भात पत्र लिहिले. त्यात नीरव यांनी म्हटले की बँकेने हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे त्यांच्या इमेज व व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे ते रक्कम वापस करणार नाही.