जगभरात 4G चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता 5G सेवा देखील लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. तरीही इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत अजूनही पिछाडीवर आहे. ओपनसिग्नलने याबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये जगभरातील सर्व इंटरनेट स्पीडचा अभ्यास केला गेला.
ओपनसिग्नलच्या रिपोर्टनुसार, देशात सध्या 4G इंटरनेटचं 86.3 टक्के कव्हरेज आहे. 4G सेवा पुरवण्यामध्ये भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेलाही मागे टाकलं आहे. पण असे असले तरी इंटरनेट स्पीडच्या यादीत भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे.
इंटरनेट स्पीडच्या टॉप पाच देशांमध्ये सिंगापूर अव्वल स्थानी आहे. सिंगापूरमध्ये 4G चा इंटरनेट स्पीड 44.31 MBPS आहे. यात दुसऱ्या स्थानावर नेदरलँड असून, तिथे 4G इंटरनेट स्पीड 42.12 एमबीपीएस आहे. तिसऱ्या स्थानावर नॉर्वे 41.20 MBPS, दक्षिण कोरिया 40.44 MBPS, तर पाचव्या स्थानावर हंगेरी 39.18 MBPS स्पीड मिळतो.