आजकाल, बँकिंगची बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. बँकेच्या मोबाइल ॲपवर सेवांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. पण तरीही कर्ज घेण्यासारखी अनेक कामे आहेत, ज्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते.दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते. जुलै महिन्यात बँका एकूण 12 दिवस बंद असणार आहे. बँका कोणत्या तारखेला बंद असणार जाणून घ्या.
6 जुलै 2024: एमएचआयपी दिनानिमित्त आयझॉल झोनमधील बँकांना सुट्टी असेल.
7 जुलै 2024: रविवारमुळे देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
8 जुलै 2024: कांग (रथजत्रा) मुळे इम्फाळ झोनमधील बँकांना सुट्टी असेल.
9 जुलै 2024: Drukpa Tshe-zi मुळे, गंगटोक झोनमधील बँकांना सुट्टी असेल.
13 जुलै 2024: दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
14 जुलै 2024: रविवारमुळे देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
16 जुलै 2024: हरेलामुळे डेहराडून झोनमधील बँकांना सुट्टी असेल.
17 जुलै 2024: मोहरममुळे जवळपास संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.
21 जुलै 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
27 जुलै 2024: चौथ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.