आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ८२ डॉलरच्या वर आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $82.62 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $78.45 वरव्यापार करत आहे.देशात सरकारी तेल कंपन्याने 15 जून 2024 रोजी सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहे.
आज राज्यातील धुळे, अहमदनगर, ठाणे आणि पालघर शहरात पेट्रोलच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे.तर नांदेड, परभणी, सांगली, जळगाव शहरात नागरिकांना पेट्रोलच्या किमतीत घसरण झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
मुंबईत 104.21 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.94 रुपये आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रति लिटर आहे. डिझेलबद्दल बोलायचे झाले तर आज देशाची राजधानी नवी दिल्लीत डिझेलची किंमत 87.62 रुपये आहे. त्याचवेळी मुंबईत डिझेलचा दर 92.15 रुपये आहे. कोलकात्यात डिझेलची किंमत 90.76 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये डिझेलची किंमत 92.34 रुपये प्रति लिटर आहे.