पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा : चव्हाण

बुधवार, 4 एप्रिल 2018 (14:16 IST)
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून तात्काळ इंधनाच्या किंमती कमी करण्याची मागणी काँग्रेस पक्ष करीत आहे. या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 
 
गेल्या काही दिवसापासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी  झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोजा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्याने बँकांच्या बुडवलेल्या हजारो कोटी रुपयांची वसुली सर्वसामान्यांकडून करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीकाही त्यंनी पत्रकार परिषदेत केली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती