या प्रकरणात मधेपुरा जिल्ह्यातील बेहरी गावाचे रहिवासी सैनी साह यांचा १३ जुलै २०११ ला आसामच्या तिलोई गावात ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. १६ ऑगस्ट २०११ रोजी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी मोबदल्यासाठी विमा कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यावर कोर्टाने सैनी यांच्या कुटुंबियांस २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ लाख ८३ हजार रुपये आणि त्यावर ९% टक्के वार्षिक व्याज देण्यास सांगितलं. पण तरीही मोबदला न मिळाल्याने कौशल्या देवी यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात कंपनीला दोनवेळेस नोटीस पाठवली पण कोणतंही उत्तर आलं नाही.