एसटी परिवहन महामंडळ संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अधिसूचना जाहीर केलीय. प्रवासी वाहतुक सुरळित ठेवण्यासाठी सरकारने काही उपाय योजना या अधिसुचनेच्या माध्यमातून सुचवल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व खाजगी वाहातूक बसेस, स्कुल बसेस, कंपनी मालकीच्या बसेस, मालवाहु वाहन यांना प्रवासी वाहातूक करण्याची मान्यता या अधिसुचनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. संप मागे घेतल्यानंतर ही अधिसूचना रद्द होणार आहे अघोषित संपामुळे एसटीचे सुमारे १५ कोटी रुपयाचं महसूल बुडाला आहे.