भारतीय वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या, मारुती अल्टो कारने गेल्या १५ वर्षांत विक्रीतील ३८ लाखांचा टप्पा ओलांडला असल्याचं जाहीर केलं आहे. ऑल्टोच्या अतुलनीय कामगिरीमुळे ही सलग १५ वर्षात चांगली विक्री होणारी कार ठरत आहे.
नवीन डिझाइन आणि सेफ्टी फिचर्ससह अल्टो वापरकर्त्यांना चांगला अनुभव देत असल्याचं ग्राहक सांगतात. नव्या अल्टोमध्ये अॅन्टीलॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्यूशन सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम आणि ड्रायव्हर-को-ड्रायव्हर दोघांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर असे सेफ्टी फिचर्स सामिल आहेत. ही कार ग्राहकांसाठी सीएनजीमध्येदेखील उपलब्ध करण्यात आली आहे.