अदानी यांच्याकडून दिघी बंदराचं अधिग्रहण

गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (16:56 IST)
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल एकोनॉमिक झोन (APSEZ) ने दिघी बंदराचं अधिग्रहण पूर्ण केलं आहे. 705 कोटी रुपयांमध्ये अदानी यांच्या कंपनीने हे अधिग्रहण केलं आहे.
 
दिघी पोर्टला जवाहरलाल नेहरू बंदराचा (JNPT) पर्याय म्हणून विकसित करण्यासाठी कंपनी याठिकाणी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. JNPT बंदर भारताचं सर्वात मोठं बंदर आहे.
 
या बंदरावरील भार कमी करण्यासाठी दिघी बंदराचा उपयोग केला जाऊ शकतो. अदानी यांची कंपनी दिघी बंदरावरील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणार आहे. याठिकाणी ड्राय, कंटेनर आणि लिक्विड कार्गोसाठी सोयी-सुविधा करण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती