60 रुपयात एक लीटर इंधन मिळणार-नितीन गडकरी

सोमवार, 21 जून 2021 (20:56 IST)
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.सामान्य जनतेला या मधून दिलासा देण्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसात सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करत आहे.आणि हा निर्णय आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फ्लेक्स-फ्यूल इंजन अनिवार्य करण्याचा.ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
 

ते म्हणाले,की हे पाऊल उचलल्यामुळे शेतकरी बांधवाना मदत होऊ शकते आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळेल.
 

ते आज व्हिडीओ प्रसारमाध्यमातून रोटरी जिल्हा परिषदेला संबोधित करत होते.ते म्हणाले की सध्या देशाच्या अनेक भागात पेट्रोलची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.त्याचे पर्यायी म्हणून इंधन इथेनॉल वापरू शकतो.या इथेनॉलची किंमत प्रति लिटर 60 ते 62 रुपये एवढी आहे.इथेनॉल वापरून भारतीयांना प्रति लिटर मागे 30 ते 35 रुपयांची बचत होईल.
 

ते म्हणाले की, परिवहन मंत्री म्हणून मी उद्योगांना आदेश देणार की वाहनांमध्ये पेट्रोल डिझेल व्यतिरिक्त फ्लेक्स फ्युल इंजन देखील असणार आणि त्यामध्ये कच्च तेल वापरण्याचा पर्याय 100 टक्के असेल.या बाबतीत येत्या 8 ते 10 दिवसातच निर्णय घेण्यात येईल असे ही ते म्हणाले.
 

येत्या काही वर्षात पेट्रोल मध्ये इथेनॉल मिसळण्यायाचे उद्दिष्ट सरकार ने केले आहे.यामुळे सरकारला मदत होईल. सध्या पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉलची मात्रा आहे.हे इथेनॉल पेट्रोलपेक्षा चांगले आहे .हे एक प्रकारचे अल्कोहल आहे,जे पेट्रोलमध्ये मिसळतात. हे उसापासून तयार केले जाते.आणि स्वदेशी असल्यामुळे ते बाहेरून आयात करावे लागत नाही.हे प्रदूषणमुक्त आहे. फ्लेक्स फ्युल इंजिन अनिवार्य केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार.आणि सामान्य जनतेला देखील फायदा होईल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती