'नॅनो'चे मार्केटिंगच चुकले- रतन टाटा

WD
'भारताची सगळ्यात स्वस्त कार' म्हणून नॅनो कारची केलेली मार्केटिंग चुकीची झाल्याचे पुन्हा एकदा टाटा समुहाचे रतन टाटा यांनी कबूल केले आहे. आता ही चूक जागतिक पातळीवर सुधारण्यात येणार असल्याचेही रतन टाटा यांनी सांगितले आहे.

जागतिक पातळीवर नॅनो पूर्ण नव्या स्वरूपात सादर केली जाणार आहे. त्यामुळे स्वस्त कार म्हणून अशी तिचे मार्केटिंग केले जाणार नसल्याचेही टाटा यांनी यावेळी स्पष्‍ट केले.

इंडोनेशियामध्ये नॅनोला नवी ओळख दिल्यानंतर भारतात नॅनो नव्या रुपात लॉंच केली जाईल, अशी आशा टाटांनी व्यक्त केली आहे. नॅनो बदलांसह पुन्हा लॉंच करण्‍याचा कंपनीने विचार केला आहे. मात्र यावेळी भारतातील स्वस्त कार अशी मार्केटिंग केली जाणार नसल्याचे टाटांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा