हॅवमोअरने तयार केले 'व्हिस्की' आयस्क्रीम

वेबदुनिया

बुधवार, 18 नोव्हेंबर 2009 (12:55 IST)
ND
ND
गुजरातमध्ये दारूबंदी आहे. राज्यातील तळीराम आता व्हिस्की पिऊ शकणार नसले तरी ते व्हिस्की खाऊ शकणार आहेत. हॅवमोअर कंपनीने नॉन अल्कोहलिक व्हिस्की आयस्क्रीम तयार केले असून, त्याची टेस्ट व्हिस्की सारखीच असल्याचा कंपनीचा दावा आहे.

गुजरातमध्ये आयस्क्रीम बाजार 200 कोटीवर आहे. अशातच व्हिस्की आयस्क्रीम तयार केल्याने कंपनीची या बाजारातील भागिदारी वाढेल असा विश्वास कंपनीचे संचालक प्रदीप चोना यांनी व्यक्त केला आहे.

तूर्तास हे फ्लेव्हर केवळ पार्टी आणि लग्नात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. इटलीवरून यासाठी काही वस्तू आयात केल्या जात असून, यानंतर कंपनीच्या नरोदा येथील प्रकल्पात हे आयस्क्रीम तयार केले जात असल्याचे चोना यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा