लवकरचं लॉन्च होणार ऑटोमॅटिक टाटा नॅनो

गुरूवार, 23 एप्रिल 2015 (16:07 IST)
टाटा नॅनोटाटा कंपनीतर्फे पुढील महिन्यात स्वयंचलित (ऑटोमॅटिक) नॅनो कारचे लाँचिंग करण्यात येणार आहे. विविध वैशिष्ट्यपूर्ण या कारच्या लाँचिंगबाबत कंपनीत विचार-विनिमय सुरू आहे. स्वयंचलित नॅनो कारमध्ये
स्मोक्ड हेडलँप आणि नवीन बंपर बसवण्यात आले आहेत.

टाटाची नवीन नॅनो कार एएमटी किंवा अटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनसह ‘क्रीप’ या कार्यकुशलतेने बाजारात अवतणार आहे. ‘क्रीप’ या वैशिष्ट्यामुळे नॅनो कार रहदारीच्या ठिकाणी कोठेही सहजरीत्या चालू आणि बंद करता येणार आहे. तसेच ऑटो ट्रान्समिशनमुळे ब्रेकवर पाय नसतानाही आरामात गाडी वळवण्यासाठी मदत होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा